Sangamner Crime: भगवा मोर्चाच्या दिवशी दुपारी हातामध्ये धारदार तलवार घेऊन भर चौकात फिरणाऱ्या एकाला (Arrested) संगमनेर शहरातील पुणे नाक्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडण्याची घटना.
संगमनेर: भगवा मोर्चाच्या दिवशी दुपारी हातामध्ये धारदार तलवार घेऊन भर चौकात फिरणाऱ्या एकाला संगमनेर शहरातील पुणे नाक्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडण्याची घटना समोर आली आहे.
संगमनेर शहरात भगवा मोर्चा झाल्यानंतर बराच गदारोळ झाला. दगडफेक, हाणामारीचे गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी बऱ्याच आरोपींना अटक देखील केली आहे. शहरात वातावरण तणावाचे होते. वेगवेगळ्या वावड्या उठत होत्या. अशाही परिस्थितीत पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते. त्यामुळे भगवा मोर्चाला गालबोट लागले मात्र पोलिसांची धावपळ सुरूच आहे.
दरम्यान आता एकेक प्रकार उघड होत असून नुकताच एक एफआयआर हाती लागला असून हा गुन्हा भगवा मोर्चा च्या दिवशी दिनांक ६ जून मंगळवारी रोजी दुपारी नोंदवला गेलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या संदर्भात कारवाई केल्याचे या एफआयआर मधून उघड झाले आहे.
भगवा मोर्चाच्या दिवशी दुपारी संगमनेर शहरातील जोर्वे नाक्याच्या पुढे जुना पुना नाका परिसरात एक इसम हातामध्ये धारदार तलवार घेऊन आजूबाजूला फिरत असल्याचे नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला समजले त्यानुसार त्यांनी सदर ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता शहरातील नाईकवाडपुरा येथील रहिवासी रौफ इस्माईल शेख नावाचा इसम हातामध्ये तलवार घेऊन फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विजय सिद्धार्थ धनेधर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संबंधित इसमाकडून दोन फूट लांब आणि मोठी पितळी मूठ असलेली टोकदार, धारदार तलवार जप्त केली आहे. रौफ इस्माईल शेख (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: man was arrested for walking around Bhar Chowk with a sharp sword in his hand in Sangamner city
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App