Home क्राईम उसने पैसे मागण्यासाठी गेलेल्या वडिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून मुलाने केली हत्या

उसने पैसे मागण्यासाठी गेलेल्या वडिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून मुलाने केली हत्या

Sangli Murder Case:  मुलांनेच जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची घटना.

son Murder the father by running a tractor over him when he went to ask for money

सांगली: सांगलीमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुलांनेच जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. वडिलांनी मुलाला दिलेले उसने पैसे मागण्यासाठी गेले असता ही घटना बुधवारी घडली आहे.

ही घटना सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील बेडग या गावात आज (बुधवार) घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी घटनेनंतर फरार झाला आहे. पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा लक्ष्मण आकळे याने वडिलांकडून 80 हजार रुपये उसने घेतले होते. वडील दादू आकळे आज सकाळी दिलेले पैसे मागण्यासाठी गेले होते. यावेळी मुलगा लक्ष्मण याने वडिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला.

या घटने नंतर मिरज ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेत. पोलीसांनी अधिक चौकशी केली असता. मुलगा लक्ष्मण आकळे याने हा प्रकार केल्याचं काही लोकांनी सांगितले. त्यानंतर मुलगा घटनास्थळावरून पळून गेला. मिरज ग्रामीण पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: son Murder the father by running a tractor over him when he went to ask for money

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here