Home औरंगाबाद समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, डुलकीने घेतला चार भावांचा जीव

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, डुलकीने घेतला चार भावांचा जीव

Accident News: तेलंगणात काकाचा अंत्यविधी आटोपून गुजरातमधील सुरतच्या दिशेने जात असलेल्या कारच्या चालकास डुलकी लागल्यामुळे गाडी दुभाजकावर आदळली. त्यात चार चुलत भावांचा मृत्यू तर पुतण्या जखमी.

accident on Samriddhi highway, sleep took the lives of four brothers

छत्रपती संभाजीनगर: तेलंगणात काकाचा अंत्यविधी आटोपून गुजरातमधील सुरतच्या दिशेने जात असलेल्या कारच्या चालकास डुलकी लागल्यामुळे गाडी दुभाजकावर आदळली. त्यात चार चुलत भावांचा मृत्यू तर पुतण्या जखमी झाला. ही घटना बुधवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील जयपूर शिवारात घडली. या अपघाताची करमाड पोलिस ठाण्यात नोंद केल्याची माहिती निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी दिली.

मृतांमध्ये सुरेशभाई रामू गौड (३८), श्रीनिवास रामू गौड (३६), संजय राजनभाई गौड (४३) आणि कृष्णा राजनभाई गौड (४८, सर्वजण रा. सुरत गुजरात) यांचा समावेश आहे. भार्गव सुरेशभाई गौड (१९) हा युवक जखमी झाला.

ब्रेकऐवजी दाबला अॅक्सलेटर

गाडी चालक संजय गौड यांना पहाटे साडेपाचच्या सुमारास डुलकी लागली. त्यामुळे भरधाव वेगातील गाडी रस्ता सोडून खाली उतरली. चालकास जाग आल्यानंतर त्याने ब्रेक दाबण्याऐवजी अॅक्सलेटर दाबले. त्यामुळे गाडी अतिशय वेगात जाऊन दुभाजकावर आदळली.

माहितीनुसार, मृत चार जण चुलत भाऊ आहेत. त्यांचे गाव तेलंगणामध्ये आहे. २१ मे रोजी त्यांच्या काकांचे निधन झाल्यामुळे चौघे चुलत भाऊ तेलंगणाला गेले होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर २३ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास सुरतच्या दिशेने एर्टिका कारने परतत असताना काळाने घाला घातला.

Web Title: accident on Samriddhi highway, sleep took the lives of four brothers

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here