Home महाराष्ट्र एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल या तारखेला तर बारावीचा निकाल आज होणार जाहीर

एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल या तारखेला तर बारावीचा निकाल आज होणार जाहीर

HSC Result 2023 and MH CET Result Date:  एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल १२ जूनच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता.

HSC Result 2023 and MH CET Result Date

पुणे: इंजिनिअरिंग, अॅग्रिकल्चर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल १२ जूनच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात कॅप प्रवेश फेऱ्यांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली.

या परीक्षेसाठी यंदा ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पीसीएम ग्रुपसाठी ३ लाख ३३ हजार ४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन लाख १३ हजार ७३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १९ हजार ३०२ विद्यार्थी अनुपस्थित होते.

बारावीच्या परीक्षेचा निकाल आज २५ मे दुपारी दोन वाजता विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर ऑनलाईन पाहता येणार आहे. त्यामुळे आजपासूनच विद्यार्थ्यांना निकालाबाबतची उत्सुकता लागून राहिली आहे. यंदा १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

दरम्यान,  निकाल जाहीर झाल्यानंतर २६ मे पासून ५ जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत. तसेच उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका ५ जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल

http://mahresult.nic.in

https://hsc.mahresults.org.in

http://hscresult.mkcl.org

Web Title: HSC Result 2023 and MH CET Result Date

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here