Home बीड कांदे झाकायला दाम्पत्य गेले ते परतलेच नाही शोध घेतला तर धक्कादायक उघडकीस

कांदे झाकायला दाम्पत्य गेले ते परतलेच नाही शोध घेतला तर धक्कादायक उघडकीस

Beed:  कांदे झाकायला गेलेल्या दाम्पत्याची आत्महत्या (Suicide).

Suicide of a couple who went to cover onions

आष्टी | बीड: तालुक्यातील वाघळूज येथील पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.

ईश्वर गुंड आणि ऋतुजा गुंड अशी मृतांची नावे आहेत. ते दोघे मंगळवारी सायंकाळी शेतात कांदे झाकण्यासाठी गेले होते. परंतु ते नंतर परतलेच नाहीत. म्हणून नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. तेव्हा या दोघांचेही मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना अवघ्या ३ महिन्यांची मुलगी आहे.

या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वाघळूज येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Suicide of a couple who went to cover onions

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here