Home अहमदनगर एका वर्षात पैसे डबल शेतकऱ्याला सात कोटींना  गंडा

एका वर्षात पैसे डबल शेतकऱ्याला सात कोटींना  गंडा

Sonai one year, the money went to a double farmer fraud 

अहमदनगर :  एका वर्षात आपले पैसे डबल करण्याचे आमिष दाखवून सोनई ता. नेवासा येथील  अण्णासाहेब मिठू दरदले या शेतकऱ्यासह अन्य काही शेतकऱ्यांना सहा कोटी ८१ लाख गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दरंदले यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीत म्हंटले आहे की, २०१७ ते २०१९ या कालावधीत भागवत व अन्य आरोपींनी संगनमत करून पैसे गुंतविले तर वर्षात दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविले. उज्वलम अग्रो मल्टीस्टेट , माउली मल्टीस्टेट सोसायटी, संकल्प सिद्धी इंडिया व प्रोफीट टीचर हॉली डे अशा वेगवेगळ्या संस्थेत मला व मित्रांना गुंतवणूक करायला लावली.  एका वर्षात पैसे दुप्पट तसेच विमान प्रवास, जमीन भागीदारी असे अन्य फायदे देण्याचे आमिष दाखविले.

त्यांनी विश्वास संपादन करण्यासाठी सोनई, शिर्डी, आळेफाटा आदी ठिकाणी  बैठका घेतल्या. गोड बोलून प्रभावित करण्यात आले. सुमारे ६ कोटी ८१ लाख २८ हजार ९८३ रुपयाची गुंतवणूक केली. स्वतः च्या फायद्यासाठी रकमेचा अपहार करून विश्वासघात केला.

याप्रकरणी विष्णू रामचंद्र भागवत रा. दवंडगाव ता. येवला जि. नाशिक, निलेश जनार्दन कुंभार रा. मंचर जि. पुणे, सुरेश सीताराम घंगाळे रा. तळेगाव ता. मावळ जि. पुणे, राजेंद्र वामनराव देशमुख, प्रवीण गंगाधर कवडे रा. कोतूळ ता. अकोले शांताराम आशिक देवतरसे रा. कर्हे वस्ती सोनई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wen Title: Sonai one year, the money went to a double farmer fraud 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here