Home महाराष्ट्र Rape | स्पा सेंटर चालक महिलेवर बलात्कार, आरोपीस अटक  

Rape | स्पा सेंटर चालक महिलेवर बलात्कार, आरोपीस अटक  

Spa center ladies driver rape

मुंबई | Mumbai: एका महिला स्पा सेंटर चालकासोबत जवळीक वाढवून त्याच महिलेवर बलात्कार (Rape) करत पैशांची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गुरुपाल पाहुजा असे आरोपीचे नाव आहे. एक राजकीय संघटनेचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. मागील तीन वर्षांपासून आरोपी गुरुपाल हा तक्रारदार महिलेसोबत बलात्कार करून तिच्या कडून वारंवार पैशांची मागणी करत होता.

तसेच बंदुकीचा धाक दाखवत याबाबत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील देत असे. आरोपी गुरुपालच्या या सर्व त्रासाला कंटाळून अखेर तक्रारदार महिलेने सानपाडा पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी गुरुपाल पाहुजाला बलात्कार सह इतर गुन्ह्यात अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून नवी मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Spa center ladies driver rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here