Home पुणे मेडिकल कॉलेजमधील लाजीरवाणा प्रकार: नराधमाने तरुणीच्या ….

मेडिकल कॉलेजमधील लाजीरवाणा प्रकार: नराधमाने तरुणीच्या ….

Embarrassing type in medical college Naradhamane young woman molestation

पुणे | Pune Crime: पुण्यातील प्रसिद्ध बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर २९ वर्षीय डॉक्टर तरुणीचा विनयभंग (molestation) केल्याचा धककादायक प्रकार उघडकीस समोर आला आहे.

तरुणी प्रवेशद्वाराजवळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांच्या पार्श्वभागावर चापट मारून पळून गेला. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी डॉक्टर तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे डॉक्टर आहे. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्या बी.जे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जात असताना अज्ञात आरोपी दुचाकीवरून त्या ठिकाणी आला आणि काही न समजण्याच्या आता त्याने डॉक्टर तरुणीच्या कमरेखाली जोराची चापट मारली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे फिर्यादी घाबरल्या. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले.

Web Title: Embarrassing type in medical college Naradhamane young woman molestation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here