Home Accident News अहमदनगर: एस. टी. व दुचाकीचा भीषण अपघात- Accident

अहमदनगर: एस. टी. व दुचाकीचा भीषण अपघात- Accident

Ahmednagar | Shrirampur Accident: शेवगाव बस डेपोचा अपघात, एसटी चालकाच्या मागील चाकाखाली दुचाकी.

ST Bus And a terrible bike accident

श्रीरामपूर: श्रीरामपूर-नेवासा रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिजवर एसटी व दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शेवगाव डेपोची नाशिक-शेवगाव ही एशियाड बस शेवगावकडे जात असताना श्रीरामपूर-नेवासा रोड रेल्वेओव्हर ब्रिजवर समोरून येणारी दुचाकी खड्डे हुकवण्याच्या प्रयत्नात दुसर्‍या वाहनाचा धक्का लागून एसटीच्या चालकाच्या बाजुने मागील चाकाखाली अडकली. या अपघातात दुचाकीस्वारास जबर मार लागला आहे.

यावेळी नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक किरण पवार, प्रशांत बारसे, भैरव आडागळे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड, वाहतुक शाखेचे पोकॉ ज्ञानेश्‍वर गुंजाळ, श्री. माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.

जखमी दुचाकीस्वारास वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ येथील साखर कामगार रुग्णालयात हलविले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. रेल्वे ओव्हर ब्रिज ते अशोकनगर फाटा दरम्यान वारंवार अपघात होत असल्याने परिसरात गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

Web Title: ST Bus And a terrible bike accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here