Home क्राईम सहलीत विस्तार अधिकाऱ्याने केला अधिक्षेकेचा विनयभंग, अधिक्षेकेशी अश्लील चाळे

सहलीत विस्तार अधिकाऱ्याने केला अधिक्षेकेचा विनयभंग, अधिक्षेकेशी अश्लील चाळे

Crime News:  प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्याने अधिक्षकेचा विनयभंग (Molested) केल्याने पोलिसांनी केली अटक.

officer molested the superintendent, assaulted

नंदुरबार:  आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी यास शहादा पोलीसांनी अधिक्षीकेचा विनयभंग केल्या प्रकरणी अटक (arrested) केली आहे. दरम्यान अधिक्षीकेनं तक्रार केल्यानंतर संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी यास सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिक्षण विभागाची विद्यार्थ्यांसमवेत वेरुळला सहल गेली होती. ही सहल 30 सप्टेंबरला परतीच्या मार्गावर होती. त्यावेळी प्रवासा दरम्यान अंधाराचा फायदा घेत बसमधील शेजारच्या सीटवर बसुन शिक्षण विस्तार अधिका-याने महिलेशी अश्लील चाळे केले.

संबंधीत अधिक्षीकेने झालेला प्रकार एक तारखेला प्रकल्प अधिकारी यांना सांगितला. यानंतर संबंधीत पिडीत अधिक्षीकेला दामिनी पथकाकडे पाठवण्यात आले होते. त्यानंतर तिने शहादा पोलीसांत गुन्हा दाखल झाला.

आर.जे. मुसळे असे अटक केलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी याचे नाव आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत असल्याची माहिती शहादा पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली.

Web Title: officer molested the superintendent, assaulted

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here