Home अकोले राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांची अकोलेत सभा

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांची अकोलेत सभा

Ajit Pawar in Akole: अगस्ती कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर सभा.

State Opposition Leader Ajit Pawar's meeting in Akole

Akole | अकोले: अकोले तालुक्यात अगस्ती साखर कारखाना निवडणूक असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोनही मंडळाच्या वतीने आरोप प्रत्यारोप एकमेकांवर सुरु आहे. नेत्यांची दोनही मंडळात ये जा सुरु आहे. जोरदार प्रचार सुरु आहे.  

या तालुक्यात परत पिचड आमदार होणार नाही असे वक्तव्य मारुती मेंगाळ यांनी केलं होतं. पिचडांचे नेतृत्व मारुती मेंगाळ यांना मान्यच नाही तर त्याच्यासोबत जाणार कसं. तत्वाची लढाही आहे. तालुक्याच्या हिताची लढाई आहे. आणि म्हणून मारुती मेंगाळ यांनी शेतकरी समृद्धी मंडळाला पाठींबा दिला आहे अशी माहिती आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिली

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार शुक्रवारी दिनांक १५ रोजी अकोले तालुक्यात विठ्ठल लॉन्स येथे सकाळी १० वाजता सभेसाठी येत आहेत अशी माहिती आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिली आहे. या सभेसाठी सर्वांनी यावे असे आवाहन त्यांनी केलं आहे.

Web Title: State Opposition Leader Ajit Pawar’s meeting in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here