Home क्राईम 40 हजारांची लाच घेताना राज्य कर अधिकारी रंगेहाथ जाळ्यात

40 हजारांची लाच घेताना राज्य कर अधिकारी रंगेहाथ जाळ्यात

जीएसटीच्या अधिकाऱ्यांकडून लाच  (Bribe) मागितल्याची तक्रार.

State tax officials caught red-handed while taking bribe

नाशिक:  जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय असलेल्या तक्रारदाराचे फिरते चित्रीकरणाचे वाहन जीएसटी भरारी पथकाने दंड न भरता सोडून दिले होते. या मोबदल्यात संशयित लाचखोर राज्यकर अधिकारी जगदीश सुधाकर पाटील (३९. रा. कर्मयोगीनगर) यांना तक्रारदाराकडून ४० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांनी जीएसटीच्या अधिकाऱ्यांकडून लाच मागितल्याची तक्रार दिली होती. तक्रारादाराचा जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय आहे. जाहिरात चित्रीकरणाच्या कामात व्यत्यय येऊन तक्रारदार यांचे पाच ते सहा लाखाचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी चित्रीकरणासाठी आलेले वाहन जीएसटी दंड न भरता जीएसटी भरारी पथकाचे प्रमुख संशयित जगदीश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सोडून दिले होते. त्या मोबदल्यात पाटील यांनी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

त्यानुसार तक्रारदार यांनी तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधीक्षक शर्मीष्ठा वालावलकर यांच्या आदेशानुसार सापळा रचला. पोलीस निरिक्षक स्वप्रिल राजपूत, नाईक प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, प्रकाश महाजन यांच्या पथकाने वस्तु व सेवा कर कार्यालयाच्या आवारात सापळा रचला.

यावेळी संशयित पाटील पाने सोमवारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून ४० हजारांची लाच स्वीकारली असता त्यास रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरूद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: State tax officials caught red-handed while taking bribe

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here