Home अहमदनगर संगमनेरच्या बसवर दगडफेक, एसटीच्या कर्मचार्‍यानेच केली दगडफेक

संगमनेरच्या बसवर दगडफेक, एसटीच्या कर्मचार्‍यानेच केली दगडफेक

Stone throwing on Sangamner's bus

अहमदनगर  | Ahmednagar | Sangamner: अहमदनगर शहरातील जिल्हा रुग्णालयाकडे जाणार्‍या रोडवर झुलेलाल चौकात एसटीच्या कर्मचार्‍यानेच संगमनेर अहमदनगर बसवर दगडफेक केल्याची घटना घटना घडली आहे. बुधवारी दुपारी  ही घटना घडली. मनोज विठ्ठल वैरागर (रा. शांतीपूर, तारकपूर, अहमदनगर) असे दगडफेक करणार्‍या कर्मचार्‍याचे नाव आहे. तो पारनेर आगारात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

याबाबत  वैरागर विरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दगडफेक झालेल्या एसटी बसवरील चालक दत्तात्रय गंगाधर गिरी (रा. गणेशनगर ता. संगमनेर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

वाचा: Ahmednagar News

दत्तात्रय गिरी हे बुधवारी दुपारी त्यांच्याकडील संगमनेर-अहमदनगर ही बस (क्र. एमएच 11 बीएल 9386) घेऊन अहमदनगर शहरामध्ये आले होते. ते जिल्हा रूग्णालयाकडील जाणार्‍या रोडवरून बस घेवुन जात असताना मनोज वैरागर याने बसवर दगडफेक केली. या दगडफेकीत बसच्या डाव्या बाजुची काच फुटून बसचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक धनराज जारवाल यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलीस हवालदार सुनील शिरसाठ करीत आहेत.

दरम्यान एस टी कर्मचाऱ्यांचा १०० दिवस उलटूनही संप सुरु आहे. काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत तर काहींचा संप सुरु असल्याने संताप व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Stone throwing on Sangamner’s bus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here