संगमनेर तालुक्यात बिबट्याचा १४ वर्षीय मुलावर हल्ला अन…
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे १४ वर्षीय मुलावर व प्रतापपूर येथे ३६ वर्षीय तरुणावर सोमवारी सायंकाळी बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेने आश्वी पंचक्रोशीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या प्राणघातक हल्ल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आश्वी बुद्रुक-निमगावजाळी रस्त्यालगत जिल्हा परिषद सदस्या अॅड. रोहिणी निघुते यांची वस्ती व संजय कुलथे यांच्या शेतीलगत विकास गायकवाड यांची वस्ती आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांचा 14 वर्षीय मुलगा प्रतिक गायकवाड हा जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात चालला होता. त्यावेळी शिकारीच्या शोधात झुडूपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्रतिकवर हल्ला करत डोके, कान व डोळ्याजवळ खोलवर गंभीर जखमा केल्या. यावेळी प्रतिकने बिबट्याचा जोरदार प्रतिकार करत आपली सुटका करुन घेत घराकडे धाव घेतली. प्रतीकला प्रवरा ग्रामीण रुग्नालायात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
वाचा: Ahmednagar News
तर दुसऱ्या घटनेत प्रतापपूर येथे नसीर युसुफ पठाण हा तरुण सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास प्रतापपूरहून दाढच्या दिशेने आपल्या दुचाकीवरुन चालला होता. यावेळी म्हसोबा मंदिरालगत असलेल्या कुरणामध्ये शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने नसीर पठाण याच्यावर हल्लाकेल्याने तो तरुण दुचाकीवरुन खाली कोसळला असता बिबट्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत करुन पुढे येण्याचा प्रयत्न केला असता नसीर पठाण याने मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या घाबरुन झुडूपात पळून गेला. त्याच्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Web Title: Bibatya attacks 14-year-old boy in Sangamner taluka