Home अहमदनगर राज्य कर अधिकार्‍यास लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले

राज्य कर अधिकार्‍यास लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले

bribe from the state tax officer, the bribery department caught him red-handed

अहमदनगर | Ahmednagar| Shrirampur:  श्रीरामपूर येथील मोबाईल फोन व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे वितरणाचा व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकाकडून 20 हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना येथील वस्तू व सेवा कर भवनातील राज्य कर अधिकार्‍यास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.

रमेश अमृता बुधवंत (वय 57 रा. खराडी, पुणे) असे या अधिकार्‍याचे नाव आहे. लाचलुचपत नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस अंमलदार सुकदेव मुरकुटे, मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

श्रीरामपूर येथील तक्रारदार यांचा मोबाईल फोन व इलेक्ट्रॉनिक वस्तू वितरणाचा व्यवसाय आहे. त्यांनी व्यवसायातील उलाढालीच्या संबंधाने विक्रीकर ताळेबंद येथील वस्तू व सेवा कर भवनाकडे सादर केला होता. या ताळेबंदात त्रुटी आढळल्याने राज्य कर अधिकारी रमेश बुधवंत यांनी तक्रारदार यांना वाढीव कर भरणा करण्याबाबत नोटीस दिली होती. सदरची नोटीस निरस्त करणे तसेच तक्रारदार यांचा व्हॅट करापोटी परतावा मिळवून देण्याकरिता मदत करण्यासाठी बुधवंत यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 35 हजार रुपये देण्याचे ठरले. लाचेचा पहिला हप्ता 20 हजार रुपयांची रक्कम वस्तू व सेवा कर कार्यालयात स्वीकारताना बुधवंत याला रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी बुधवंत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: bribe from the state tax officer, the bribery department caught him red-handed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here