Home अहमदनगर संगमनेर तालुक्यात महावितरणच्या वायरमनची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर तालुक्यात महावितरणच्या वायरमनची गळफास घेऊन आत्महत्या

MSEDCL wireman commits suicide by strangulation in Sangamner 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील घारगाव महावितरणच्या वायरमनने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रदीप शांताराम कडाळे वय २५ रा. कडाळे वस्ती घारगाव असे या आत्महत्या केलेल्या वायरमनचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घारगाव महावितरण येथे कडाळे हे कार्यरत होते. अकलापूर रोड येईल एका कॉम्प्लेक्समध्ये ते राहत होते. गुरुवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास त्यांनी बेडरूमचा दरवाजा लावला. दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या पत्नी पूजा यांनी कडाळे यांच्या मित्रांना फोन करून माहिती देत बोलाविले. त्यांच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांच्या मित्रांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कडाळे यांनी पंखा लटकाविन्याच्या हुकाला कापडी बेडशीट बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह खाली घेतला. मृतदेह संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. या ठिकाणी पती पत्नी दोघेच राहत होते. त्यांनी आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करीत आहे.  

Web Title: MSEDCL wireman commits suicide by strangulation in Sangamner 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here