Home अकोले संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत अकोलेतील दुचाकीस्वार ठार

संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत अकोलेतील दुचाकीस्वार ठार

Sangamner Accident Two-wheeler driver killed in Akole collision

Sangamner Accident | संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी फाटा येथे एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालक जागेवरच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

विलास काशिनाथ जगधने वय ५५ रा. आंभोळ ता. अकोले (Akole) असे मूत्यूमुखी झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.

अकोले तालुक्यातील आंभोळ येथील रहिवासी तथा लक्ष्मी मंगल कार्यालय घारगाव येथील कर्मचारी विलास जगधने हे मंगळवारी नाशिक पुणे महामार्गाने आळेफाटा येथून दुचाकीवरून घारगाव येथे परतत असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कुरकुंडी फाट्याजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात ते जागेवरच ठार झाले.

Web Title: Sangamner Accident Two-wheeler driver killed in Akole collision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here