Home अहमदनगर अहमदनगर: सात दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी: कोटीहून अधिक नुकसान

अहमदनगर: सात दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी: कोटीहून अधिक नुकसान

Loni Seven shops damaged by fire

Ahmednagar | Rahata | राहता: राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक गावातील हसनापूर रस्त्यावरील सात दुकानांना आग (fire) लागून जळून गेल्याची घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यामध्ये रेशीम उद्योगासाठी आवश्यक साहित्य पुरवठ्याचे गोदाम, इलेक्ट्रिकल, फर्निचर, सलून अशी सात दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

लोणी बुद्रुक गावातील हसनापूर रस्त्यावरील गुरुवारी रात्री दुकानांना आग लागून सात दुकाने भक्ष्यस्थानी सापडली आहे. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या आगीत सुमारे सुमारे एक कोटीहून अधिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Web Title: Loni Seven shops damaged by fire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here