Home संगमनेर संगमनेर शहरातील इलेक्ट्रिकल दुकान फोडणारा चोरटा गजाआड

संगमनेर शहरातील इलेक्ट्रिकल दुकान फोडणारा चोरटा गजाआड

Theft broke into an electrical shop in Sangamner town

Sangamner | संगमनेर: संगमनेर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या (Theft) व घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक भयभीत झाले असताना संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने दमदार कामगिरी करत अवघ्या पाच तासांत इलेक्ट्रिकल दुकान फोडणाऱ्या चोरट्याच्या मुद्देमालासह मुसक्या आवळल्या आहेत.

सोमवारी रात्री शहरातील नवीन नगर रोडवरील दत्तकृपा इलेक्ट्रिकल दुकानाचे छताचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख १० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद अनिल दत्तू राहणे रा. चंदनापुरी यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाने तपास सुरु केला होता. दत्ता सीताराम गोसावी याने त्याच्या साथीदारसोबत हि चोरी केल्याची माहिती पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली. त्यांच्या पथकाने दत्ता सीताराम गोसावी रा. जमजम कॉलनी गल्ली नंबर ६ यास सापळा रचून ताब्यात घेतले आहे. साथीदार अल्ताफ शेख याच्याशी संगनमत करून सदरचा गुन्हा केल्याचे गोसावी याने पोलिसांना सांगितले. त्याच्याकडून चोरी गेलेल्या ३ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्याने लोणी व श्रीरामपूर परिसरात चोरीची कबुली त्याने दिली आहे.  

Web Title: Theft broke into an electrical shop in Sangamner town

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here