Home Accident News Accident: सात गाड्यांचा विचित्र अपघात, कारमधील चार जण ठार

Accident: सात गाड्यांचा विचित्र अपघात, कारमधील चार जण ठार

Strange accident of seven vehicles, killing four people in the car

पुणे | Accident: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर धक्कादायक भीषण अपघात घडला असून चार जण ठार तर ९ जण जखमी झाले आहेत. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर सात वाहनांचा विचित्र अपघात झाला. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी गावाजवळ हा अपघात झाला आहे. ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने हा भीषण अपघात घडला आहे. अपघातानंतर सात वाहनं एकमेकांवर आदळल्याने दोन ट्रकच्या मध्ये स्विफ्ट कार अडकली होती. या गाडीमधील चौघे जण जागीच ठार झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी खोपोलीत हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स, अपघातग्रस्तांच्या मदतीला पोहोचली. पोलिसांची टीम आणि इतर यंत्रणांनी अपघातग्रस्तांना मदत केली. या अपघातानंतर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यात आली.

Web Title: Strange accident of seven vehicles, killing four people in the car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here