Home अहमदनगर विवाहित महिलेच्या चारीत्र्यावरुन शिविगाळ केल्याने तिने संपविली जीवनयात्रा

विवाहित महिलेच्या चारीत्र्यावरुन शिविगाळ केल्याने तिने संपविली जीवनयात्रा

Suicide by abusing the character of a married woman

Ahmednagar | Shevgaon | शेवगाव:  शेजारील लोकांनी एका विवाहित महिलेला तिच्या चारीत्र्यावरुन केलेली शिविगाळ जिव्हारी लागल्याने हा अपमान सहन न झाल्याने थेट गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची अत्यंत धक्कादायक घटना शेवगाव येथे घडली आहे.

संगिता आशिष परदेशी ( वय-३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.  या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

जमीर उर्फ गोटया रफीक शेख, त्याची पत्नी आसमा जमीर शेख व त्यांचा मुलगा शाकीर जमीर शेख असे त्या आरोपींचे नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी,  वरील तिघा जणांनी मयत महिलेस वारंवार तिच्या चारीत्र्यावरुन शिविगाळ केली होती. तिला हा अपमान सहन न झाल्याने तिने आपले जीवन संपविल्याची फिर्याद महिलेचा पती आशिष विजय परदेशी यांनी दिली आहे.

Web Title: Suicide by abusing the character of a married woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here