Home महाराष्ट्र मोठी बातमी: राज्यात कडक लॉकडाऊन नियमावली जाहीर

मोठी बातमी: राज्यात कडक लॉकडाऊन नियमावली जाहीर

Strict lockdown regulations announced in Maharashtra

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा कहर झालेला आहे. राज्यातील विविध शहरात कोरोना रुग्णांच्या वाढीत कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात ब्रेक ड चैन च्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. २२ एप्रिल रात्री ८ वाजेपासून आणखी निर्बंध लागू करण्यात आले आहे, हे निर्बंध १ मे २०२१ पर्यंत लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील.

लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर:

  • लोकल रेल्वे प्रवास फक्त फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, सामान्य प्रवाशांना प्रवेश बंद
  • सरकारी कार्यालयात फक्त १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती
  • लग्नासाठी एका हॉलमध्ये २५ माणसांच्या उपस्थितीत परवानगी, २ तासांची मर्यादा नियमांचे उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपये दंड
  • खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड
  • अत्यावश्यक सेवेतील कार्यालयामध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार
  • इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार.
  • भाजीपाला, दुध दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहणार आहे.
  • जिल्हाबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी असेल

Web Title: Strict lockdown regulations announced in Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here