Home महाराष्ट्र संप मिटला! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

संप मिटला! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

सुकाणू समितीच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर संप (Strike) मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

strike of state government employees called off after the Chief Minister, Deputy Chief Minister's discussion

मुंबई:  आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यभरातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी सात दिवसांपासून संपावर आहेत. आज अखेर हा संप मिटला आहे. सुकाणू समितीच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील सात दिवसांपासून संपामुळे शिक्षण, रुग्णालय, महाविद्यालय, नगर पालिका, जिल्हा परिषद, म्हाडा, तहसील कार्यालय यांसह अनेक सरकारी विभागांचे कामकाज ठप्प होते. संपामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील रखडले आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे, असल्याचं सुकाणू समितीच्या सदस्यांनी म्हटलं आहे. ही चर्चा यशस्वी झाली आहे. जुनी पेन्शन योजनेसंदर्भात गंभीरपणे विचार करत आहोत. या विषयाची माहिती मिळवण्यासाठी समिती नेमली आहे, असं सरकारने म्हटलं आहे.

सरकारने जुन्या पेन्शनसंबंधीची भूमिका स्वीकरली असून जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सुकाणू समितीच्या शिष्टमंडळाचे सदस्य विश्वास काटकर यांनी दिली आहे.

संपकरी कर्मचाऱ्यांना सरकारने पाठवलेल्या नोटीसा मागे घेणार असल्याचं आश्वासनही सरकारने दिलं आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर हजर राहावं. सर्व प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असं आवाहनही काटकर यांनी कर्मचाऱ्यांना केलं आहे.

बैठकीतील निर्णय

>> जुनी आणि नवीन पेन्शन योजनेतील तफावत ठेवणार नाही.

>> जुनी पेन्शन योजना सारखी आर्थिक लाभ देण्यात येणार.

>> शासनाने तत्वत धोरण स्वीकारले.

> सरकार लेखी हे संघटनेला देणार.

Web Title: strike of state government employees called off after the Chief Minister, Deputy Chief Minister’s discussion

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here