Home अहमदनगर अहमदनगर: दगडाच्या खाणीत महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ

अहमदनगर: दगडाच्या खाणीत महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ

Ahmednagar News: शिर्डी-सिन्नर महामार्गाच्या कडेला के.के. मिल्कसमोर असणाऱ्या दगडाच्या खोल खाणीमध्ये रविवारी एका महिलेचा मृतदेह (Dead body) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

woman dead body was found in a stone quarry

शिर्डी:  शिर्डी जवळील सावळीविहीर खुर्द शिवारात शिर्डी-सिन्नर महामार्गाच्या कडेला के.के. मिल्कसमोर असणाऱ्या दगडाच्या खोल खाणीमध्ये रविवारी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्याचप्रमाणे एक पोत्याचे बाचकेही पाण्यात तरंगत असून ते काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे.

महिलेचा मृतदेह खाणीच्या या पाण्यातून बाहेर काढण्यात आला असला तरी या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. साधारण ३५ ते ४० वर्षे या महिलेचे वय असावे व एक ते दोन दिवसांपूर्वीच या महिलेचा पाण्यात मृत्यू झालेला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत चर्चेला उधाण आले आहे. शिर्डी नगरपरिषद आणि साईबाबा संस्थानच्या अग्निशामक दलाने शर्तीचे प्रयत्न करून अनोळखी महिलेचा मृतदेह बाहेर काढला. पोत्याचे बाचके या खाणीच्या पाण्यामध्ये असल्यामुळे नेमके या बांधलेल्या पोत्यात काय आहे? याची उत्सुकता होती. पोत्याचे बाचके अग्निशामक दलाने पाण्याचा फवारा मारत कडेला आणले. त्या पोत्यात पाणी आणि हवा भरली असल्याने फुगून पाण्यावर तरंगत होते. मात्र त्यात काही नसल्याने उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास टाकला. शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पटेल, गडाख, दिनकर व पोलीस कर्मचारी येथे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. अधिक तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत.

Web Title: woman dead body was found in a stone quarry

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here