Home अहमदनगर अहमदनगर: घराच्या छतावरच शॉक बसून विद्यार्थ्याचा मृत्यू

अहमदनगर: घराच्या छतावरच शॉक बसून विद्यार्थ्याचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: दहावीत शिकत असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.

student died of Electric shock sitting on the roof of the house

श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव येथील दहावीत शिकत असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. ओम संतोष देवराय (वय १५) असे मयत झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ओम देवराय हा इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याने मार्च २०२४ मध्येच दहावीची परीक्षा दिली होती. ओम हा पत्र्याच्या घरात राहत होता. उष्णतेची तीव्रता कमी व्हावी, म्हणून तो घराच्या छतावर उसाचे वाढे टाकण्यास गेला होता. पत्र्यावरून गेलेल्या विजेच्या तारेचा जबर शॉक बसून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओम हा कान्हेगावचे सरपंच देवराय यांचा पुतण्या आहे. शांत व संयमी स्वभाव असलेला ओम नेहमी धार्मिक कार्यात अग्रेसर असायचा. त्याच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: student died of Electric shock sitting on the roof of the house

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here