Home औरंगाबाद धक्कादायक! कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच घरातील 7 जणांचा मृत्यू

धक्कादायक! कपड्याच्या दुकानाला भीषण आग, एकाच घरातील 7 जणांचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Fire : कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना, दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू.

Heavy fire at a clothing shop, 7 people died in the same house

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग (fire) लागल्याची घटना घडली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे कपड्याचे दुकान छावणी दाना बाजार  गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला होते.

शहरातील छावणी परिसरातील जैन मंदिराजवळ असलेल्या एका तीन मजली इमारतीला मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे.

या आग लागलेल्या इमारतीत एकूण 16 लोक होते. पहिल्या मजल्यावर 7 लोक होते. तर दुसऱ्या मजल्यावर 7 लोक होते आणि तिसऱ्या मजल्यावर 2 लोक होते. यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील सर्व सात लोकांचा मृत्यू झाला आहे. आसिम वसीम शेख, 3 वर्ष मुलगा, परी वसीम शेख 2 वर्ष मुलगी, वसीम शेख, 30 वर्ष, तन्वीर वसीम,महिला  23 वर्ष, हमीदा बेगम, 50 वर्ष, शेख सोहेल 35 वर्ष, रेश्मा शेख 22 वर्ष अशी मृतांची नावे आहेत.

Web Title: Heavy fire at a clothing shop, 7 people died in the same house

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here