Home अकोले अकोले: कोकण कड्यावरून उडी; तरुणीने संपवले जीवन

अकोले: कोकण कड्यावरून उडी; तरुणीने संपवले जीवन

Breaking News | Akole: तरुणीने हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना.

Suicide by jumping from the Konkan cliff of Harishchandragad

राजूर : घाटकोपर (मुंबई) येथील आवणी मावजी भानुशाली (वय २२) या अविवाहित तरुणीने रविवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्यादरम्यान हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मयत तरुणी आवणी ही रविवारी (दि. ७) हरिश्चंद्रगडावर आली होती. परिसर फिरून ती कोकण कड्याजवळ आली. तेथून तिने खोल दरीत उडी मारून जीवन संपविले आहे. त्यापूर्वी कोकण कड्याजवळ मृत आवणीने आपली बॅग ठेवली होती. त्यात तिचा मोबाइल, भगवद्‌गीता व चिठ्ठी लिहून ठेवली होती. घटनेची माहिती स्थानिकांनी राजूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे, पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, विजय मुंढे व इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

तिच्या मोबाइलचा आधार घेत तिने डायल केलेल्या मोबाइल क्रमांकांची माहिती मिळवत पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना कळवले. त्यानंतर मृत आवणीचे वडील मावजी जेठालाल भानुशाली (रा. घाटकोपर, मुंबई) यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली. यात आपली मुलगी आवणी मावजी भानुशाली हिने स्वतःच स्वतःच्या काही तरी तणावातून अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गड येथील कोकणकडा येथून खोलदरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याचे सांगितले.

स्थानिकांच्या व रेस्क्यू टीमच्या मदतीने पोलिसांनी ऑपरेशन करून सदर युवतीचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर राजूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास मिळालेल्या या खबरीवरून राजूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे आणि विजय मुंढे व एस. आर. पवार करीत आहेत.

Web Title: Suicide by jumping from the Konkan cliff of Harishchandragad

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here