Home अहमदनगर अहमदनगर: मुलगी सकाळी जॉगिंगला गेलेली परत आलीच नाही

अहमदनगर: मुलगी सकाळी जॉगिंगला गेलेली परत आलीच नाही

Breaking News | Ahmednagar: सकाळी जॉगिंगनिमित्त घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी परत न आल्याने तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याबाबत फिर्याद दाखल.

minor girl did not return, she was lured away by an unknown person

जामखेड : सकाळी जॉगिंगनिमित्त घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी परत न आल्याने तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याबाबत येथील पोलिस ठाण्यात तिच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, ७ एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजता जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणारी १७ वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी तपनेश्वर रोडला जॉगिंगला जाऊन येते असे सांगून घरातून गेली. मात्र बराच वेळ झाला ती घरी न आल्याने तिच्या वडिलांनी शोधाशोध केली. मात्र ती न सापडल्याने अखेर एका अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी जामखेड पोलिस स्टेशनला दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पगारे हे करत आहेत.

Web Title: minor girl did not return, she was lured away by an unknown person

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here