Home संगमनेर संगमनेर: घरात गांजाची विक्री, पोलिसांचा छापा

संगमनेर: घरात गांजाची विक्री, पोलिसांचा छापा

Breaking News | Sangamner Crime: घरातून  गांजाची पाकीट तयार करून विकत असताना पोलिसांनी घरावर छापा (Raid) टाकत कारवाई.

Selling ganja at home, police raid

संगमनेर: घरातून  गांजाची पाकीट तयार करून विकत असताना पोलिसांनी घरावर छापा टाकत कारवाई केल्याची घटना समोर आली आहे.  शहर पोलीस ठाण्याच्या पन्नास मीटर अंतरावर असणाऱ्या पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजुस गांजावर डिबीने कारवाई केली. यामध्ये ५ हजार ४८१ रुपयांचा गांजा हस्तगत केला. यात संजय राजु मालुंजकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार दि.९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली. गेली अनेक दिवसांपासून येथे गांजा विकत असल्याची तक्रारी वारंवार पोलीस ठाण्यात येत होत्या. पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असताना पोलिसांना काल कारवाईसाठी मुहूर्त लावला.

गल्ली बोळाचा आणि अंधाराचा फायदा घेऊन हा गांजा विकला जात होता. एका पुडीचे शंभर रुपय दराने विक्री होत होती. हा सर्व प्रकार संजय गांधीनगर मधील एका घरात होत होता. जेव्हा घरातून पाकीट तयार करून विकत असताना पोलिसांनी घरावर छापा टाकला. त्यामध्ये ६०० ग्रॅम हिरवट कलरचा गांजा आढळुन आला आहे. हा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून अधिक तपास पोलीस निरीक्षक मथुरे करत आहे.

Web Title: Selling ganja at home, police raid

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here