Home अहमदनगर अहमदनगर: आईसमोर मुलीचा हात धरला; अन् त्याने वार केला

अहमदनगर: आईसमोर मुलीचा हात धरला; अन् त्याने वार केला

Breaking News | Ahmednagar: आईसोबत घरासमोर बसलेल्या मुलीचा हात धरल्याने समजावण्यासाठी गेलेल्यांना कुन्हाडीने मारहाण.

Holds daughter's hand in front of mother And he struck

अहमदनगर : आईसोबत घरासमोर बसलेल्या मुलीचा हात धरल्याने समजावण्यासाठी गेलेल्यांना कुन्हाडीने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. ७) घडली. याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करण काळे (रा. वडगाव गुप्ता, ता. नगर) असे गुन्हा झालेल्या दाखल इसमाचे नाव आहे. रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मुलगी आईसोबत घरासमोर बसली होती. त्यावेळी तिथे आरोपी आला. त्याने मुलीचा हात धरला व चल उठ माझ्याबरोबर चल, असे म्हणत विनयभंग केला. त्यावेळी काहींनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने कुन्हाडीच्या दांड्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष नेहुल करत आहेत.

Web Title: Holds daughter’s hand in front of mother And he struck

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here