Home पुणे मित्राच्या मदतीने पोटच्या मुलीनेच केला आईचा खून !

मित्राच्या मदतीने पोटच्या मुलीनेच केला आईचा खून !

Breaking News | Pune Crime: मुलीने मित्राच्या मदतीने सख्ख्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस.

Pot's daughter killed her mother with the help of her friend

पुणे : वडगाव शेरी परिसरातील मुलीने मित्राच्या मदतीने सख्ख्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला प्रसाधनगृहात पाय घसरून पडल्याने आईचा मृत्यू झाला आहे, असा बनाव मुलीने रचला होता. परंतु, मुंबई येथील एका नातेवाईकाने तक्रार दिल्यानंतर पोलीस तपासात मुलीनेच आपल्या आईचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात मुलीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगल संजय गोखले (४५, राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत गोखले यांचे नातेवाईक विनोद शाहू गाडे (४२, रा. गोवंडी, मुंबई) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. योशिता संजय गोखले (१८, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) आणि यश मिलिंद शितोळे (रा. गणेशनगर, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल गोखले यांच्या बँक खात्यातून मुलीने मित्राच्या मदतीने परस्पर पैसे काढले होते. ही बाब आईला समजल्यानंतर ती रागवेल, अशी तिला भीती वाटली. त्यामुळे आई झोपेत असताना मुलीने तिच्या मित्राला घरातील हातोडा दिला. यशने मंगल यांच्या डोक्यात हातोड्याने वार करून जखमी केले. तसेच मुलगी योशिताने आईचे स्कार्फने तोंड दाबून धरले. मात्र, हा प्रकार कोणाला कळू नये, यासाठी घरात आई पाय घसरून पडल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा बनाव रचला, असे फिर्यादीत म्हटले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Pot’s daughter killed her mother with the help of her friend

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here