संगमनेर: मदत करतो म्हणत महिलेला घातला गंडा

    Breaking News | Sangamner Crime: मदतीचा बहाणा करून आलेल्या अनोळखी युवकाने मोपेड बंद पडल्याचा गैरफायदा घेत ती लंपास केल्याची घटना.

    Saying that he was helping, the woman was Fraud

    संगमनेर : एका शाळेत निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी जात असलेल्या महिला शिक्षिकेची मोपेड रस्त्यात मध्येच बंद पडली होती. मदतीचा बहाणा करून आलेल्या अनोळखी युवकाने मोपेड बंद पडल्याचा गैरफायदा घेत ती लंपास केल्याची घटना  रविवारी (दि.७) सकाळी शहरातील तीनबत्ती चौकात घडली. याप्रकरणी सोमवारी (दि.८) रात्री संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    वैशाली विटेकर (वय ४६, रा. घुलेवाडी) या शिक्षिकेची मोपेड चोरीला गेली, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवून घेतला. विटेकर यांच्यासमवेत अन्य एक शिक्षिका त्यांचे सुझुकी एक्सेस १२५ (एम. एच.१७, सी.एच. ६३६६) मोपेडवरून निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी एका शाळेत जात होत्या. त्यांची मोपेड मध्येच बंद पडली. तेवढ्यात तेथे एक अनोळखी युवक आला. बंद पडलेली मोपेड सुरू करण्यासाठी मदत करतो, असे त्याने सांगितले. पुढे काही अंतरावर एक गॅरेज होते. तेथे हा युवक मोपेड घेऊन गेला. तुमची मोपेड दुरुस्त करून घेतो, असे त्याने सांगितले. विटेकर प्रशिक्षणाला निघून गेल्या. काही वेळाने विटेकर या गॅरेजवर आल्या तेथे त्यांनी मोपेडच्या दुरुस्तीबाबत विचारले. संबंधित युवक मोपेड घेऊन गेल्याचे गॅरेजचालकाने विटेकर यांना सांगितले.

    Web Title: Saying that he was helping, the woman was Fraud

    See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here