Home ठाणे वादळासह पावसाचा तडाखा; होर्डिंग कोसळून ८ ठार

वादळासह पावसाचा तडाखा; होर्डिंग कोसळून ८ ठार

Breaking News | Ghatkopar: घाटकोपर येथील एका पेट्रोल पंपाजवळील जाहिरातीचा महाकाय फलक अचानक कोसळला. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला, तर ६९ जण जखमी.

burst of rain with a storm 8 killed in hoarding collapse

मुंबई/ ठाणे/डोंबिवली/ कल्याण : वैशाखातील प्रचंड उष्प्यामुळे वातावरण तप्त असतानाच सोमवारी अचानक मुंबई आणि परिसराला वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. रेल्वे, रस्ता आणि विमान वाहतुकीला या पावसाचा मोठा फटका बसला. पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर येथील एका पेट्रोल पंपाजवळील जाहिरातीचा महाकाय फलक अचानक कोसळला. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला, तर ६९ जण जखमी झाले.

नवी मुंबई, ठाण्यातून हवामान बदलाला सुरुवात झाली. दाटून आलेल्या ढगांनी दक्षिण मुंबईकडे आगेकूच करण्यास सुरुवात केली. वादळी वारे मुंबईवर घोंगावत असतानाच धूळ वातावरणात मिसळल्याने मुंबईच्या आसमंतात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. दादरच्या शिवाजी पार्कची धूळ वातावरणात मिसळत असतानाच वरळीपासून फोर्टपर्यंत सर्वत्र वादळी पावसाने थैमान घातले.

घाटकोपर येथे वादळात पेट्रोलपंपावरील जाहिरातीचे फलक कोसळले.

घाटकोपर इथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग तातडीने काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अशा प्रकारचे होर्डिंग किंवा कुठलेही बांधकाम पडू शकते, त्याबाबत राज्यभर उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन विभागाचे प्रमुख व मुख्य सचिवांना दिल्या.

प्रचारावर पाणी अवकाळी पावसाचा फटका प्रचारालाही बसला. त्यामुळे अनेक राजकीय सभा आणि प्रचाराच्या रॅली रद्द कराव्या लागल्या. तसेच कार्यकर्त्यांनीही प्रचाराऐवजी मदतकार्याला प्राधान्य दिले.

Web Title: burst of rain with a storm 8 killed in hoarding collapse

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here