Home अहमदनगर सुजय विखे हे स्वतःला मतदान करू शकले नाहीत

सुजय विखे हे स्वतःला मतदान करू शकले नाहीत

Breaking News | Ahmednagar: महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे स्वतःला मतदान करू शकले नाहीत.

Sujay Vikhe could not vote himself

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे स्वतःला मतदान करू शकले नाहीत. त्यांनी त्यांचे मूळ गाव लोणी (ता. राहाता) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयात विखे पाटील परिवाराने मतदानाचा हक्क बजावला.

लोणी हे गाव शिर्डी लोकसभा मतदारसंघात येते. डॉ. सुजय विखे हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यामुळे स्वतःला मतदान ते करू शकले नाहीत. त्यांनी शिर्डी मतदार संघात मतदान केले.

ज्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत, तिथल्या मतदार यादीत त्यांची नोंद नसल्यानं त्यांच्यावर ही वेळ आलीय. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधले महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, अहमदनगरचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि पुण्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचा समावेश आहे.

संदीपान भुमरेंचं मतदान जालना मतदारसंघातल्या पैठणमध्ये आहे, सुजय विखेंचं नाव शिर्डी मतदारसंघातल्या लोणीमधल्या मतदारयादीमध्ये आहे तर वसंत मोरे यांचं नाव कात्रजमधल्या मतदारयादीत असून हा भाग शिरुर मतदारसंघाला जोडलेला आहे. त्यामुळे हे उमदेवार मतदानापासून दूर राहिले आहेत.

Web Title: Sujay Vikhe could not vote himself

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here