Home अहमदनगर लोकसभा शिर्डी मतदार संघात इतके टक्के मतदान

लोकसभा शिर्डी मतदार संघात इतके टक्के मतदान

Breaking News | Shirdi lok sabha Election 2024: ६३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 

voting percentage in Lok Sabha Shirdi Constituency

शिर्डी: शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिर्डी विधानसभा – मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले निसर्गाने साथ दिल्याने व ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी – झाली. तालुक्यातील ६३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

महायुतीचे (शिवसेना) उमेदवार – खासदार सदाशिव लोखंडे यांनी – शिर्डीतील आदर्श माध्यमिक विद्यालयात सकाळी आठ वाजता – सपत्नीक येऊन तर महाविकास – आघाडीचे (उद्धव ठाकरे गट) उमेदवार – माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डीतील साईनाथ माध्यमिक • विद्यालयात सकाळी नऊ वाजता – सहकुटुंब येऊन मतदान केले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, – महायुतीचे (भाजपा) उमेदवार डॉ सुजय विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, जिल्हा – परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी लोणी बुद्रुक येथे सकाळी साडेसात वाजता आपला मतदानाचा हक्क बजावला. लोखंडे व वाकचौरे यांच्यासह विखे पाटील परिवाराने देवदर्शन घेऊन विजयासाठी साकडे घातले.

सकाळपासून दिवसभर मतदान केंद्रावर गर्दी टिकून होती. मोठ्या गावांमध्ये दिवसभर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी सात ते नऊपर्यंत पहिल्या दोन तासात ५ ८५ टक्के मतदान झाले. नऊ ते अकरापर्यंत ९५२ टक्के, अकरा ते एकपर्यंत १५ ८३ टक्के, एक ते तीनपर्यंत १३ १५ टक्के, तीन ते पाच या वेळेत १२ ३७ टक्के मतदान झाले.

या मतदारसंघात ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ३८४६ मतदार आहेत. यातील ११३ मतदारांच्या इच्छेनुसार त्यांच्या घरी जाऊन मतदान घडवून आणण्यात आले. याशिवाय येथे १४४६ दिव्यांग असून यातील केवळ ८ मतदारांनी त्यांच्या इच्छेनुसार आपल्या घरी मतदानाचा हक्क बजावला. त्रुटी आढळल्याने मतदान सुरू होण्यापूर्वी शिर्डीत एक युनिट बदलण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रांतधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार तथा अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, निवासी नायब तहसीलदार हेमंत पाटील, मुख्याधिकारी सतीश दिघे सकाळी मॉकपोल दरम्यान यंत्रात आदींनी परिश्रम घेतले.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात सरासरी ६१ टक्के मतदान

संगमनेर : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि.१३) शिर्डी लोकसभेसाठी मतदान झाले. संगमनेर विधानसभा मतदारसंघात सरासरी ६१ टक्के मतदान झाले. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर ९ वाजेपर्यंत १६,२४७ मतदारांनी मतदान केले, तोपर्यंत १०.९२ टक्के मतदान झाले होते. तीन ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक अडचणी आल्या होत्या. तथापि, प्रशासनाने त्वरित दखल घेत समस्या सोडविली, अशी माहिती संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी सांगितले.

अकोल्यात ५९ टक्के मतदान

अकोले : तालुक्यात देवठाण परिसरात गारांसह तर राजूर व आंभोळ भागात अवकाळीने दुपारी हजेरी लावली. अकोले परिसरात पाच वाजण्याच्या दरम्यान थोडा शिडकाव झाला, पण मतदानावर त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. तालुक्यात एकूण ५९ टक्के मतदान झाले.

कोपरगाव : शिर्डी लोकसभेसाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात किरकोळ प्रकार वगळता अंदाजे ६५ टक्के मतदान झाले. सकाळी व सायंकाळी मतदारांनी केंद्रात रांगा लावलेल्या होत्या. उत्साही वातावरण मतदारांमध्ये दिसून येत होते. दोन ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या, तर एक ठिकाणी व्हीव्हीपॅट बंद पडल्याची घटना घडली; मात्र तत्काळ मशिन बदलण्यात आल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

Web Title: voting percentage in Lok Sabha Shirdi Constituency

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here