Home अकोले अकोले: पतीच्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीस अटक

अकोले: पतीच्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीस अटक

Suicide of a married woman due to physical and mental abuse of her husband

Akole | अकोले: आई वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये तरच तुला नंदाविन, पैसे आणले नाही तर घरातून हाकलून देऊन दुसरीशी लग्न करीन अशी धमकी देत वेळोवेळी मानसिक व शाररिक छळ करून पत्नीस आत्महत्या (Suicide) करण्यास  प्रवृत्त केल्याप्रकरणी पती बाळासाहेब विष्णू वाकचौरे रा. रुंभोडी ता. अकोले याच्याविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक (Arrest) करण्यात आली आहे.

तालुक्यातील रुंभोडी येथील शीतल बाळासाहेब वाकचौरे वय ३५ या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

त्यानंतर निर्मला हरीश्चंद्र रोकडे रा. ठाणे यांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हंटले आहे की, दिनांक १-०५-२०१० ते ०३-०६-२०२२ दरम्यान फिर्यादीची मुलगी शीतल तिच्या सासरी राहत घरी नांदत असताना पती बाळासाहेब विष्णू वाकचौरे याने आई वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये तरच तुला नंदाविन, पैसे आणले नाही तर घरातून हाकलून देऊन दुसरीशी लग्न करीन अशी धमकी देत वेळोवेळी मानसिक व शाररिक छळ केला. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार मयत विवाहितेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहे.

Web Title: Suicide of a married woman due to physical and mental abuse of her husband

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here