Home महाराष्ट्र बॉलिवूडमध्ये खळबळ: सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, मुसेवालाप्रमाणेच…

बॉलिवूडमध्ये खळबळ: सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, मुसेवालाप्रमाणेच…

bollywood actor salman khan has received threat

मुंबई | Salman Khan: बॉलिवूडमधून खळबळजनक माहिती हाती आली आहे. अभिनेता सलमान खानला अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबी गायक सिद्धू  मुसेवालाप्रमाणेच जीवे मारण्याची धमकी सलमान खानला देखील मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमानचे वडील सलीम खान सकाळी जॉगिंगसाठी गेले असता तिथे त्यांना बेंचवर सलमानच्या नावे असलेलं धमकीचं पत्र मिळालं. या पत्रात सलमानला सिद्धू मुसेवालाप्रमाणे मारण्यात येणार असल्याचं म्हटलंय. सलीम खान यांना सकाळी साडे सात ते आठच्या दरम्यान हे पत्र मिळाल्याचं समजतंय.

या धमकीनंतर याबाबत वांद्रे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात कलम 506 (2) भादविनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. मुसेवालाप्रमाणेच  धमकी दिल्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या प्रकारामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: bollywood actor salman khan has received threat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here