Home पुणे Accident: शिवसेनेचे आमदार व माजी जलसंधारण मंत्री यांच्या गाडीला अपघात

Accident: शिवसेनेचे आमदार व माजी जलसंधारण मंत्री यांच्या गाडीला अपघात

Accident to the car of Shiv Sena MLA Tanaji Sawant

Solapur | सोलापूर: शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री हा अपघात झाला आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणाला काहीही झाले नाही मात्र गाडीचे नुकसान झाले आहे.

शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे दोन दिवस आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. तानाजी सावंत हे भूम-परंड्याहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड येथे हा अपघात झाला. उस्मानाबादहून ते पुण्याला निघाले असताना हा अपघात घडला.

Web Title: Accident to the car of Shiv Sena MLA Tanaji Sawant

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here