Home अहमदनगर Suicide: रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या

Suicide: रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या

Suicide of a young man under a train

श्रीरामपूर | Suicide: राहता तालुक्यातील रांजणगाव येथील तरुणाने श्रीरामपूर येथील सुतगिरणीपासून काही अंतरावर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना काल घडली आहे, आत्महत्या करण्यामागचे कारण अजून समजू शकले नाही. तेथून काही अंतरावरच त्याची मोटारसायकल आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

भाऊसाहेब काशिनाथ पडवळ असे या युवकाचे नाव आहे. रांजणगावचे भाऊसाहेब हे काल स्प्लेंडर एम.एच. ६८५५ हे त्याच्या मोटारसायकलवरून श्रीरामपूरच्या सुतगिरणीजवळ आला होता. त्याची मोटारसायकल तेथे जवळच लावली होती. काल दुपारी एक वाजेच्या सुमारास आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस नाईक शेलार व पोलीस नाईक कारखेले यांनी तात्काळ तपास करुन मयताची ओळख भाऊसाहेब पडवळ अशी पटवुन दिली.  याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Suicide of a young man under a train

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here