Home अहमदनगर अहमदनगर: उसनवारीतून एकाची आत्महत्या; गुन्हा दाखल

अहमदनगर: उसनवारीतून एकाची आत्महत्या; गुन्हा दाखल

Breaking News | Ahmednagar Crime: उसनवारीचे १० लाख रूपये परत करण्यास टाळाटाळ केल्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Suicide of one from Usanwari Filed a crime

राहुरी | Rahuri : उसनवारीचे १० लाख रूपये परत करण्यास टाळाटाळ केल्याने मुसळवाडी येथे शनिवारी लक्ष्मण चिमन धनवडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  रवींद्र करपे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

धनवडे व करपे भागीदारीत जनावरांचा खरेदी विक्री व्यवसाय करत होते. ९ वर्षापूर्वी धनवडे यांनी भिशीचे ५ लाख रुपये करपे यास उसने दिले होते. २०१९ मध्ये धनवडे यांनी घराचे बांधकाम सुरू केले, तेव्हा करपे यास पैशाची मागणी केली. ‘आता पैसे नाही, तुम्ही १० लाख रुपयाचे घरकर्ज करा. त्यातील पाच लाख रुपये ठेवा व ५ लाख रुपये मला द्या’. पूर्वीचे ५ आणि हे ५ लाख असे १० लाखाच्या कर्जाचे हप्त्याने मी परतफेड करीन, असा शब्द दिला होता. मात्र नंतर करपे याने हप्ते भरण्यास व उसनवारीचे पैसे परत करण्यास टाळाटाळ केली. धनवडे व त्यांचा मुलगा करपे याच्याकडे पैसे मागण्यासाठी गेले असता, तुम्ही वारंवार माझ्या घरी आ- लेतर मी जीवाचे बरे वाईट करुन घेईल’, अशी धमकी करपे याने दिली होती. तेव्हापासून धनवडे चिंताग्रस्त होते. शनिवारी (दि.१०) पहाटे धनवडे यांनी घरासमोरील पडवीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी चिठ्ठीमध्ये सविस्तर घटना लिहून ठेवली, असे अनिल लक्ष्मण धनवडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Suicide of one from Usanwari Filed a crime

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here