Home अहमदनगर अहमदनगर: ट्रक दुचाकी धडक, अंगावरून ट्रक गेल्यामुळे एक ठार

अहमदनगर: ट्रक दुचाकी धडक, अंगावरून ट्रक गेल्यामुळे एक ठार

Breaking News | Ahmednagar:  ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना.

truck collided with a two-wheeler, one was killed as the truck ran over him

नेवासा: नेवासे-श्रीरामपूर राज्यमार्गावरील नेवासा बुद्रुक शिवारात ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. १२) सकाळी ११च्या सुमारास घडली.

भोकर (ता. श्रीरामपूर) येथील किशोर बबन आहेर (वय २६) आणि त्याचा मित्र कैलास उल्हास अमोलिक हे वडाळा बहिरोबा (ता. नेवासा) येथे मित्राच्या लग्नाला मोटरसायकलवरून जात असताना नेवासा बुद्रुक शिवारात ट्रकने (एमएच १६ एई ९२०७) मोटरसायकलला जोराची धडक दिली. यामध्ये कैलास अमोलिक याच्या अंगावरून ट्रक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला, तर किशोर बबन आहेर (वय २६) गंभीर जखमी झाला. आहेर याच्यावर नेवासा फाटा येथील खासगी दवाखान्यात औषधोपचार सुरू आहेत.

याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक अप्पासाहेब लक्ष्मण साबळे (रा. देवटाकळी, ता. शेवगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: truck collided with a two-wheeler, one was killed as the truck ran over him

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here