अहमदनगर धक्कादायक घटना! मंदिरातील ३० लाखांचे सिंहासन चोरीला
Breaking News | Ahmednagar: श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात अज्ञात चोरट्यांनी देवाचे सुमारे ३० लाखांचे ५० किलो चांदीचे सिंहासन चोरुन नेल्याची घटना.
श्रीगोंदा : तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात अज्ञात चोरट्यांनी देवाचे सुमारे ३० लाखांचे ५० किलो चांदीचे सिंहासन चोरुन नेल्याची घटना सोमवारी (दि. १२) रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार पारगाव सुद्रिक येथील ग्रामदैवत श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरामध्ये सोमवारी (दि.१२) रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा मुख्य दरवाजाचा कडीकोंडा कटवणीच्या सहाय्याने तोडून मंदिरात प्रवेश करत मंदिरातील सुद्रिकेश्वर महाराजांचे सुमारे ३० लाखांचे ५० किलो चांदीचे सिंहासन नेले. घडलेल्या घटनेची माहिती पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा येथील प्रसिध्द व्यापारी कुटुंबासह दर्शनासाठी आले असता त्यांना दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला असल्याचे दिसून आले. त्यांनी मंदिराचे पुजारी प्रवीण रमेश धुमाळ यांना घडलेल्या घटनेची माहिती फोन करून दिली. पुजारी धुमाळ यांनी मंदिराकडे धाव घेत मंदिरात जाऊन पाहिल्यावर मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घडलेल्या घटनेची माहिती श्रीगोंदा पोलिसांना समजताच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी निरीक्षक दिनेश आहेर, बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे, पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी धाव घेत पाहणी करत तपास सुरू केला. चोरीचे चित्रीकरण मंदिरात असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, श्रीगोंदा पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही तपासात तांत्रिक माहिती संकलन करत तपास सुरू केला आहे.
Web Title: throne worth 30 lakhs was stolen from the temple
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study