Home औरंगाबाद Suicide: डॉक्टरसह तीन तरुणांच्या आत्महत्या

Suicide: डॉक्टरसह तीन तरुणांच्या आत्महत्या

Suicide Case: डॉक्टरसह तीन तरुणांनी वेगवेगळ्या कारणातून आत्महत्या केल्याच्या घटना.

Suicide of three youths including a doctor Aurangabad

औरंगाबाद |  Aurangabad: शहरात आयुर्वेदिक डॉक्टरसह तीन तरुणांनी वेगवेगळ्या कारणांवरून आत्महत्या केल्या. मुकुंदवाडी, संजयकनगर व माळीवाडा परिसरातील या तिन्ही घटना आहेत. डॉ. दत्तात्रय दगडू घेतला. सुत्रावे (वय ३८), रोहित भोळे (वय २६) व साईनाथ पंडितराव हेकडे, अशी आत्महत्या करणाऱ्या तरुणांची नावे आहेत.

दत्तात्रय सुत्रावे यांचा घरातच दवाखाना होता. दोन दिवसांपूर्वी दोन धाम दर्शन करून आले होते. शुक्रवारी सायंकाळी भूख लागल्याचे सांगून त्यांनी आईला मॅगी बनविण्यास सांगितले. आईने मॅगी तयार करून आणेपर्यंत दत्तात्रय यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केला. संजयनगर येथे राहणारा रोहित गौतम भोळे हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिवार्ह करीत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याला नशेचे व्यसन जडले होते. त्यातूनच रोहितने शुक्रवारी रात्री गळफास घेतला.

या दोन्ही घटनेची मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार व्ही. आर. भिडे व महिला पोलीस एस. एल. जाधव हे तपास करीत आहेत. माळीवाडा येथील साईनाथ हेकडे या तरुणानेही नशेत खुलताबाद तालुक्यातील वडोद खुर्द येथील रोपवाटिकेत गळफास घेतला. याप्रकरणी खुलताबाद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Web Title: Suicide of three youths including a doctor Aurangabad

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here