अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, प्रियकराने मित्राच्या साथीने…
Gang rape: मुलीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल.
मुंबई : १५ वर्षांच्या मुलीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तर, १८ वर्षांवरील तिघांना अटक करण्यात आली. आरोपींपैकी दोघांनी तिच्यावर अत्याचार केला असून उर्वरित आरोपींनी त्यांना मदत केल्याचा आरोप आहे.
वरळी येथील १५ वर्षांची मुलगी गुरुवारी जांबोरी मैदान परिसरात फिरत असताना तिचा १६ वर्षीय प्रियकर तिथे आला. त्याने एका घरात नेऊन मित्राच्या साथीने तिच्यावर अत्याचार केला. यावेळी घरात अन्य आहे. चार मित्र उपस्थित होते. त्यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे.
Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business
याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात मुलीच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून शुक्रवारी सायंकाळी तीन आरोपींना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यापैकी दोन आरोपी १८ वर्षांचे असून एक आरोपी १९ वर्षांचा आहे. उर्वरित दोन आरोपी १६ वर्षे, तर एक आरोपी १७ वर्षे ७ महिन्यांचा आहे. अल्पवयीन मुलांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.
Web Title: The gang rape of a minor girl
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App