Home Accident News संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रकचा अपघात

संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रकचा अपघात

Sangamner Accident: ट्रक चालकाला रात्रीच्या वेळेस गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रक समोरील अज्ञात वाहनाला धडकून दुभाजकावर आदळला.

Truck accident on Pune Nashik highway due to not predicting traffic jam

संगमनेर | अहमदनगर : नाशिक-पुणे महामार्गावर पुण्याच्या दिशेने बटाटे घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाला रात्रीच्या वेळेस गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रक समोरील अज्ञात वाहनाला धडकून दुभाजकावर आदळला. यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने ट्रकचालक आणि क्लिनर दोघे बचावले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे घडला. नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने प्रवाशांनी डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली.

याबाबत अधिक माहिती अशी, ट्रक क्रमांक एम.पी. ०७ एच.बी. २७८८ मधून चालक व क्लिनर (नाव समजू शकले नाही) हे ग्वालियर (मध्यप्रदेश) येथून बटाटे घेऊन नाशिक पुणे महामार्गाने पुणे जिल्ह्यात जात “असताना शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास ते संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे आले असता ट्रक चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रक समोरील अज्ञात वाहनाला धडकला. पुढे गतिरोधकावर आदळून दुभाजकावर चढला. यात ट्रकचे मोठे नुकसान झाले, चालक स्टिअरिंगमध्ये अडकला असता महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या अपक्षात जीवितहानी झाली नाही. मात्र, नाशिककडे जाणारी एक लेन बंद झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

Web Title: Truck accident on Pune Nashik highway due to not predicting traffic jam

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here