Home औरंगाबाद दुपारी दुकानात आला, ज्युसमधून विषारी औषध घेतलं; स्वत:च्याच मेडिकलमध्ये तरुणाने संपवलं जीवन

दुपारी दुकानात आला, ज्युसमधून विषारी औषध घेतलं; स्वत:च्याच मेडिकलमध्ये तरुणाने संपवलं जीवन

Crime News: उच्चशिक्षित असलेल्या औषध डिस्ट्रीब्यूटरने ज्युसमध्ये विषारी औषध प्राशन करून मेडिकलमध्ये आत्महत्या (Suicide )केल्याची धक्कादायक घटना.

Suicide Poisoned medicine taken from the juice The young man ended his life

छत्रपती संभाजीनगर : उच्चशिक्षित असलेल्या औषध डिस्ट्रीब्यूटरने ज्युसमध्ये विषारी औषध प्राशन करून मेडिकलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही शुक्रवारी १४ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता उघडकीस आली आहे.

राहुल मोहन पाराशर (३३ वर्षीय) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो यादव नगर एन ११ हडको या परिसरात राहत होता.

मिळालेली माहिती अशी की राहुल हा उच्च शिक्षित असून गेल्या काही दिवसांपासून तो छत्रपती संभाजीनगर येथे औषध डिस्ट्रीब्यूटर म्हणून काम करत होता. त्याचं नागेश्वरवाडी या भागामध्ये तनिषा नावाचं दुकान होतं. त्याच्याकडे चार माणसं कामासाठीही होती. या ठिकाणाहून तो शहरातील औषध विक्रेत्यांना औषध पुरवत होता.

पाच वर्षांपूर्वी राहुलचा विवाह झाला होता. पत्नी गृहिणी असून त्यांना साडेतीन वर्षाचा मुलगा आहे. दरम्यान शुक्रवारी राहुल कामाच्या निमित्ताने घरातून बाहेर पडला. त्यानंतर दुपारच्या दरम्यान तो त्याच्या दुकानात आला. दुपारच्या सुमारास त्याने दुकानात असताना ज्युसमध्ये उंदीर मारणाचं अल्युमिनियम फॉस्फेट हे औषध टाकून ते ज्युसमधून प्राशन केलं.

अस्वस्थ वाटायला लागल्यानंतर त्याने घाटीत काम करणाऱ्या मित्राला फोन करून माहिती दिली. त्यानंतर मित्राने त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र घाटी रुग्णालयात आयसीयू बेड उपलब्ध नसल्याने त्याला खाजगी दवाखान्यात दाखल केलं गेलं. खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान राहुलचा मृत्यू झाला.

राहुलने आर्थिक ताणतणावातून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार रमेश कंदे करत आहेत.

Web Title: Suicide Poisoned medicine taken from the juice The young man ended his life

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here