Home क्राईम फोटो स्टेटसला ठेवला, स्वत:ला श्रद्धांजली वाहिली; आईला मारल्याच्या पश्चातापातून तरुणाने संपवलं आयुष्य

फोटो स्टेटसला ठेवला, स्वत:ला श्रद्धांजली वाहिली; आईला मारल्याच्या पश्चातापातून तरुणाने संपवलं आयुष्य

Sangali News: एका तरुणाने स्वतःला श्रद्धांजली वाहत त्याचं स्टेटस सोशल मीडियाला ठेवून आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार.

Tributes to himself by posting his status on social media and commits suicide

सांगली: जत तालुक्यातील येळवी येथे एका तरुणाने स्वतःला श्रद्धांजली वाहत त्याचं स्टेटस सोशल मीडियाला ठेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. २२ वर्षीय औदुंबर विजय जगताप असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.

धक्कादायक म्हणजे औदुंबरची आई रुग्णालयात उपचार घेत होती आणि दुसऱ्या बाजूला औदुंबरने ही आत्महत्या केली आहे. आईला मारहाण केल्याच्या पश्चातापातून त्याने ही आत्महत्या केल्याची चर्चा गावात सुरू आहे. मात्र अद्याप आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

दरम्यान आत्महत्येच्या आदल्या दिवशी औदुंबर याचं आणि त्याच्या आईचं कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यातून औदुंबरने आपल्या आईला बेदम मारहाण केली होती. आईला मारहाण केल्यानंतर औदुंबरच्या मामाने औदुंबरच्या आईला जत येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. जतमधल्या रुग्णालयामध्ये औदुंबरच्या आईवर उपचार सुरू असताना त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली

राहत्या घरात कोणी नसताना औदुंबरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी औदुंबरने आपला स्वतःच्याच फोटो स्टेटसला ठेवला. फोटो स्टेटसला ठेवत त्याखाली श्रद्धांजली असंही त्याने लिहिलं. श्रद्धांजली लिहिलेला हा फोटो त्याने सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवला आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

Web Title: Tributes to himself by posting his status on social media and commits suicide

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here