Home महाराष्ट्र उन्हाच्या झळा आणखी वाढणार; हवामान खात्याचा इशारा | Weather Update

उन्हाच्या झळा आणखी वाढणार; हवामान खात्याचा इशारा | Weather Update

Weather Update in Maharashtra: येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढणार असून यंदाचा उन्हाळाही दीर्घकाळ टिकणारा असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली.

Summer Weather Update in Maharashtra

मुंबई: महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात असणारी थंडीची लाट आता परतताना दिसून येत असताना  अनेक भागांत तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळांमुळं सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. फेब्रुवारी महिना संपलाही नसताना तापमानाच झालेली वाढ पाहता आणखी चार महिने उन्हाळा किती तीव्र होणार? या प्रश्नानंच अनेकांना धडकी भरली आहे.

पुणे  शहरात असणाऱ्या कोरेगाव पार्क भागातील कमाल तापमान सलग दहाव्या दिवशी 37.5 अंशांवर पोहोचल आहे. 9 फेब्रुवारीला इथं 37 तर 12 तारखेला 38.4 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली होती. ही आकडेवारी पाहता शहर आणि जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी किमान तापमानासोबतच कमाल तापमानाचीगी विक्रमी नोंद करण्यात आल्याची माहिती समोर आली.  2023 या संपूर्ण वर्षात उन्हाळ्याची सुरुवात राज्यातील कोकण, विदर्भ किंवा मराठवाड्याच होण्याआधीच उन्हाच्या झळांनी पुणेकरांना घाम फोडला आहे.

महाराष्ट्रासह गुजरात आणि गोव्यामध्ये पुढील काही दिवसांत कापमान तब्बल 37 ते 39 अंशांमध्ये असेल अशा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये वाढत्या तापमानामुळं नागरिकांना त्रास होऊ शकतो. सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान उन्हाडा कडाका जास्त असल्यामुळं यादरम्यान गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असाही इशारा अभ्यासकांनी दिला आहे.

येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढणार असून यंदाचा उन्हाळाही दीर्घकाळ टिकणारा असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं मुंबईकरांसह राज्यातील इतरही भागात असणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Web Title: Summer Weather Update in Maharashtra

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here