Indorikar Maharaj: इंदोरीकर महाराज त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये खटला दाखल.
संगमनेर: गर्भलिंग बाबत केलेले वादग्रस्त वक्तव्यामुळे निवृत्ती काशिनाथ देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये खटला दाखल आहे. त्या खटल्याच्या संदर्भाने आज, शुक्रवारी (दि. १३) त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले असल्याची माहिती समोर आली आहे. आता इंदोरीकर महाराज काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
संघर्ष विभागाच्या सचिव रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक यांनी न्यायालयात फिर्याद दाखल करण्याचे यांनी आदेश दिले होते. १९ जून २०२०ला संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खटला दाखल झाला. हा खटला रद्द व्हावा, म्हणून इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या वकिलामार्फत येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयात दाद मागितली होती. त्या खटल्यात इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल लागला. त्या संदर्भात निकालाच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी सांगितले.
संघर्ष विभागाच्या सचिव अॅड. गवांदे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात अॅड. गवांदे यांच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर त्या निकालाच्या विरोधात इंदोरीकर महाराज हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तेथे इंदोरीकर महाराजांच्या विरोधात निकाल लागला. संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात दाखल असलेला खटला पुन्हा चालविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार पुन्हा सुनावणी सुरू होणार असल्याचे अॅड. गवांदे यांनी माहिती सांगितली.
Web Title: Summons Nivritti Indorikar Maharaj to appear in court
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App