Home अकोले अकोले: ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्याला तीन महिने सश्रम कारावास

अकोले: ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्याला तीन महिने सश्रम कारावास

Akole News: अकोले ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्याला तीन महिने सश्रम कारावास.

Three months rigorous imprisonment for beating a village servant

संगमनेर:  ग्रामसेवकाला मारहाण करणाऱ्याला तीन महिने सश्रम कारावास आणि २० हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे.  येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी बुधवारी (दि. ११) हा निकाल दिला. दत्तात्रय विठ्ठल गोंदके (रा. करंडी, ता. अकोले) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे  नाव आहे.

ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक येडे यांच्यासह पाणीपुरवठा कर्मचारी शशिकांत गोंदके, शिपाई विठ्ठल गोंदके, रोजगार सेवक सोमनाथ वायाळ हे दैनंदिन कामकाज करीत होते. रोजगार हमी योजनेच्या शिवार फेरीचे सर्वेक्षण असल्याने ग्रामसेवक येडे आणि कृषी सहायक अनिल फापाळे यांना गावात जायचे होते. त्याचदरम्यान करंडी गावातील दत्तात्रय विठ्ठल गोंदके हा ग्रामपंचायत कार्यालयात आला. ग्रामसेवक येडे यांना तो एक अर्ज देऊ लागला. सर्वेक्षण करण्यासाठी गावात जायचे आहे, ते झाल्यानंतर मी तुम्हाला माहिती देतो, असे ग्रामसेवक येडे म्हणाले. परंतु, गोंदके हा ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. ग्रामसेवक येडे बाहेर जाऊ नयेत म्हणून त्याने ग्रामपंचायत कार्यालयाचा दरवाजा बाहेरून लावून घेतला.

दोन तास दरवाजा बंद होता. त्यानंतर ग्रामसेवक येडे बाहेर जात असताना त्याने त्यांच्या छातीत जोरात लाथ मारली, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात येडे यांना मारहाण झाली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. यात सरकारी वकील म्हणून अॅड. मच्छिंद्र गवते यांनी काम पाहिले. साक्षीदार तपासण्यात आले. ॲड. गवते यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीश मनाठकर यांनी आरोपी दत्तात्रय गोंदके याला शिक्षा सुनावली.

Meth lab bust अॅड. गवते यांना पोलिस हेड कॉस्टेबल प्रवीण डावरे, महिला पोलिस कॉस्टेबल प्रतिभा थोरात, नयना पंडित, स्वाती नाईकवाडी, दीपाली दवंगे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Three months rigorous imprisonment for beating a village servant

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here